‘पुनश्च’ ही माझी खुमखुमी आहे, आणि मराठीत तर खुमखुमीची मोठी परंपरा आहे
मी जेव्हा मराठी नियतकालिक सुरू करायचा निर्णय घेतला, तेव्हा अपेक्षेप्रमाणे ‘पैसे कमावण्याचे उद्योग सोडून हे घालवण्याचे उद्योग तुला का सुचतायत?’ या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. पण मग खुमखुमी कशाला म्हणावं? खुमखुमीची मराठीत मोठी परंपरा मोठी आहे. ही खुमखुमी म्हणजे काहीतरी सांगण्याची, व्यक्त होण्याची उर्मी. आणि म्हणूनच डिजिटल मराठी नियतकालिक सुरू करण्याचं मी ठरवलं.......